कोव्हीशिल्डचा दुसरा डोस आता ८४ दिवसानं मिळणार, पहिल्या डोसचे लसीकरण सूरू राहणार - डाॅ. अरविंद पठाणे - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2021

कोव्हीशिल्डचा दुसरा डोस आता ८४ दिवसानं मिळणार, पहिल्या डोसचे लसीकरण सूरू राहणार - डाॅ. अरविंद पठाणे

डाॅ. अरविंद पठाणे

चंदगड / प्रतिनिधी

       माणगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रात उद्या शनिवार दि. १५ मे  पासून नागरिकांना दुसरा डोस ८४ दिवसानंतर देण्यात येणार आहे. नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस लस उपलब्धतेनुसार नियमितपणे देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डाॅ. अरविंद पठाणे यांनी दिली. 

      उद्या शनिवार दि.१५ मे पासून कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यात दरम्यान द्यायचा आहे. म्हणजेच पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसानंतर दुसरा डोस द्यावयाचा आहे. यासाठी कोविन ॲप मध्ये बदल केलेला असून पहिला डोस घेतल्यापासून 84 दिवसाच्या आत व्हेरिफिकेशन होत नाही. या बाबतचा आदेश राज्य आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यानी प्रसिद्धीस दिला आहे. 

     त्यामुळे दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर १२ आठवड्यांनी म्हणजेच ८४ दिवसानंतर घ्यावयाचा आहे. याची सर्व कर्मचारी व आशा कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे इथून पुढे सर्व जेव्हा जेव्हा आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा ज्या लोकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेले आहेत, अशा नागरिकांनाच दुसरा डोस साठी आरोग्य केंद्रात पाठवावे. तसेच ज्या नागरिकांचा पहिला डोस घ्यायचा आहे अशा नागरिकांनी आरोग्य केंद्रात लस घेण्यास हरकत नाही. सध्या लस उपलब्ध नसून लस आल्यानंतर कळविण्यात येईल.No comments:

Post a Comment