हडलगे- तारेवाडी बंधारा दुरूस्तीला घट प्रभेच्या पाण्याचा व्यत्यय - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2021

हडलगे- तारेवाडी बंधारा दुरूस्तीला घट प्रभेच्या पाण्याचा व्यत्यय

घटप्रभा नदीला पाणी आल्याने बंधारा दुरूस्तीच्या कामाला व्यत्यय निर्माण झाला आहे.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे ते तारेवाडी  येथील घटप्रभा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे कामात घट्प्रभा नदिला पाणी आल्याने व्यत्यय निर्माण झाला आहे. काहीही उपाययोजना करून हे अर्धवट काम आठवड्यात पुर्ण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
चंदगड - आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील १३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. गणूचीवाडी  बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पाणी पूर्ण क्षमतेने अडविण्यात आले आहे. कोवाड व हडलगे येथील काम  चालू आहे. पण या आठवडयात दोन्ही तालूक्यात पाऊस पडल्याने पाणी पातळी वाढली आहे.
       घटप्रभा  व ताम्रपर्णी नदीला पाणी आल्याने या दोन्ही  कामामध्ये व्यत्यय आला आहे. हडलगे येथील बंधाऱ्याला १८ बर्गे आहेत. त्यापैकी  उत्तर बाजूकडील ४ बर्गे पूर्णत : निकामी झाले आहेत. ते आता पूर्ण काढण्यात आले असून त्यांची दुूरूस्ती चालू आहे. पण गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे नदिला पाणी आले आहे. त्यामूळे दुरूस्ती काम संथपणे चालू आहे. मे चा शेवटचा आठवडा आहे. जूनमध्ये मोठ्या पावसाला सुरवात होते. त्यापूर्वीच हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. नाहीतर पाणी पातळी पाढल्यास काम अर्धवट राहून बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यासाठी या आठवड्यात संबधित ठेकेदाराने याची दखल घेऊन काम पूर्ण करणे गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment