हडलगे येथे धुळवाफ भात पेरणीला सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2021

हडलगे येथे धुळवाफ भात पेरणीला सुरवात

हडलगे येथील शेतकरी शिवाजी पाटील व सौ. लक्ष्मी पाटील कुरीच्या सहाय्याने भात पेरणी करताना.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      काळ्या मातीत, मातीत तीफन चालते, ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो हे शेतकरी जीवनाचे तंतोतंत वर्णन हडलगे (ता. गडहिंग्लज) परिसरात दिसून येत आहे. येथील शेतकरी धूळवाफ  भात पेरणीच्या कामात मग्न झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

           हडलगे ते किणी कर्यात भागात बहूतांश शेतकरी भाताची धूळवाफ पेरणी करतात. या भागात रोप करता येत नसल्याने मे च्या शेवटच्या आठवडयात पेरणीला सुरवात केली जाते. पण हडलगे येथील शेतकरी शिवाजी  पाटील  यानी या वर्षी लवकरच भात पेरणीला सुरवात केली आहे. सध्या या परिसरात भात उगण्याइतपत पुरेसा पाऊस पडला आहे. त्यामूळे सहा टाळाच्या कुरीच्या साह्याने पठारावरील भात पेरणी पूर्ण केली. सध्या लॉक डाऊन असल्याने रासायनिक खत व बियाणे मिळू शकली नाहीत. त्यामूळे घरी असलेल्या बियाणांचा च वापर करण्यात येत आहे. लॉक डाऊन मुळे शाळकरी मुलांचा उपयोग शेती कामासाठी केला जात आहे . सध्या तरी हडलगे परिसरात भात पेरणीची धांदल उडाली आहे.

No comments:

Post a Comment