अडकूर ग्रामस्थांनी जपली'सामाजिक बांधिलकी, अपघाताग्रस्ताला केली २२ हजारांची मदत, अडकुरकरांचे दातृत्व - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2021

अडकूर ग्रामस्थांनी जपली'सामाजिक बांधिलकी, अपघाताग्रस्ताला केली २२ हजारांची मदत, अडकुरकरांचे दातृत्व

अपघातग्रस्त बाबु कांबळे यांना मदत देताना अडकूर ग्रामस्थ.


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

      अडकूर (ता. चंदगड)  मधील बाबू पिराजी कांबळे यांचा चार दिवसापुर्वी अपघात झाला. परिस्थितीने गरीब असलेल्या बाबूला रुग्णांलयाचे बील परवडणारे नव्हते. बाबूच्या वेदना व दुःख पाहून अडकूर गावातील ग्रामस्थांनी २३ हजारांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासली.

    अडकूर गावच्या धार्मिक विधीचे वर्षील बाबूकडे आहे. या संदर्भातील माहीती अशी - मलगेवाडी वरून काम आटोपून गावी येताना अपघात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब  व हलाखीची आहे. त्यांना दवाखाण्यासाठी  पैशाची गरज होती. वैद्यकीय खर्च खुप होता. यासाठी युनिटी फौंडेशन अडकूरचे अभयदादा देसाई-अडकूरकर व  धोंडिबा उर्फ बंडू कांबळे यांनी आर्थिक मदत जाहिर करून  मोलाचे सहकार्य केले व इतरांना मदतीचे आव्हान केले. त्याला अनुसरून अडकूर गावातील सेवा भावी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत तत्परतेने मदतीचा हात तर दिलाच पण ईश्वराकडे बाबू लवकर बरा होण्यासाठी प्रार्थनाही केली. 

                    खालील सेवाभावी व्यक्तीनी मदत केली

युनिटी फैंडेशन अडकूर, अभयदादा देसाई, बंडू उर्फ धोंडीबा कांबळे, बाळू दळवी, संतोष  देसाई, अंकुश कदम, सुनिल कांबळे, श्रीधर  शिंदे, संदिप आर्दाळकर, तानाजी  अंबिटकर, स्वरा  घोरपडे, जावेद  कोवाडकर, नंदकुमार सावर्डेकर, सागर दड्डीकर, सुधाकर पवार, प्रशांत कुट्रे, अमोल देसाई, जितेंद्र देसाई, सुनिल देसाई, संदिप देसाई, मोहन इंगवले यांनीही मदत करुन माणुसकी जपली. अडकूरच्या या मदतकर्त्यां  ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment