मराठा आरक्षणप्रश्नी मराठा बांधवांची शनिवारी बैठक, कोठे, वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

मराठा आरक्षणप्रश्नी मराठा बांधवांची शनिवारी बैठक, कोठे, वाचा सविस्तर........

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मराठा आरक्षण प्रश्नी विचारविनिमय करण्यासाठी चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक शनिवार दि. २९ मे रोजी कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित केल्याची माहिती प्रा. दीपक पाटील यांनी दिली.

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चाललेल्या आंदोलनामध्ये आपल्या तालुक्यातील मराठा समाजाबरोबर इतर समाजातील लोकांनी भाग घेतला होता. मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी सरकारने कायदाही केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. याबाबत विचार विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी दि. २९ मे रोजी सकाळी १० वाजता कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सकल मराठा समाजाने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला उपस्थित राहणाऱ्या बांधवांनी कोरोनाचे नियम पाळत सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्कचा वापर करून बैठकीला उपस्थित रहावे.No comments:

Post a Comment