या हंगामातील काजू सुकवून ठेवण्याचे विजयभाई पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

या हंगामातील काजू सुकवून ठेवण्याचे विजयभाई पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामातील आपल्या काजू चांगल्या पद्धतीने वाळवून ठेवाव्यात असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यातील नेते विजयाभाई पाटील-जंगमहट्टिकर यांनी केले आहे.                  
      यंदाच्या वर्षी काजू हंगामात गेल्या वर्षाच्या तुलनेत काजूचे उत्पादन खुपचं कमी झाले आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे  काजू खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे खरेदी करणा-यांना बाहेर फीरून काजू खरेदी करता आले नाही. त्याच प्रमाणे उत्पादकांना ही बाहेर विक्रीसाठी जाता येत नाही. काही कारखानदारांनी काजू ११० रुपये किलो दराने खरेदी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दर वर्षाप्रमाणे खरेदीसाठी काजू व्यापारी, कारखानदार बाहेर पडतील. तोपर्यंत काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या काजू सुकवून, सुरक्षित ठेवाव्यात. शासनाकडे काजु दर वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे प्रसिध्दी पत्रकात शेतकरी कामगार पक्षाचे विजयभाई पाटील-जंगमहट्टीकर यांनी म्हटले आहे.


No comments:

Post a Comment