कोवाड व परिसरातील 217 दुकानदारांची कोरोना तपासणी, किती जण सापडले पॉझिटिव्ह, वाचा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

कोवाड व परिसरातील 217 दुकानदारांची कोरोना तपासणी, किती जण सापडले पॉझिटिव्ह, वाचा..........


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत गेल्या तीन दिवसात रॅपिड अँटीजेन कोरोना तपासणी करण्यात आली. स्वॅब घेतलेल्या २१७ पैकी तिघे पॉझिटिव्ह आढळून आले. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांनी दिली.

      उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे यांनी नुकतीच कोवाड येथे भेट देऊन कोवाडसह परिसरातील सर्व दुकानदार, भाजीविक्रेते, पीठ गिरणी चालक मालक, सेवा संस्था, दूध संस्था, पतसंस्था, बँकांतील कर्मचारी आदींची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जे दुकान मालक अशी तपासणी करून घेणार नाही त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश दिले होते. त्यास अनुसरून आरोग्य केंद्राच्या वतीने कोवाड, कागणी, कालकुंद्री येथे कॅम्प घेऊन तपासणी केली. त्यात कोवाड येथे  १४० पैकी १ कागणी येथे ३९ पैकी १ (बाहेरगावचा) तर कालकुंद्री येथे ३८ पैकी २ जण पॉझिटिव्ह आले. राहिलेल्यांनी  केंद्रात जाऊन स्वॅब देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही मोठ्या गावात कॅम्प घेणार असल्याचे समजते.

        दरम्यान आज कोवाड येथील तपासणी न केलेल्या दुकानदारांची दुकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याचे समजते.

      गेल्या तीन दिवसात डॉ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा अधिकारी नरेंद्र राजपूत, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, रोहन भास्कर, संभाजी आगोसे, आरोग्य सेविका हेमलता गावित, रेणुका कांबळे, आशा स्वयंसेविका संगीता कांबळे व कविता बाचुळकर (कागणी). सुमन सकट, माया पाटील, अंजना पाटील (कालकुंद्री). ॲम्बुलन्स चालक आनंद कांबळे यांनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment