वायंगन भात मळणीमध्ये पावसाचा व्यत्यय, शेतकरी चिंताग्रस्त - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

वायंगन भात मळणीमध्ये पावसाचा व्यत्यय, शेतकरी चिंताग्रस्त

डोणेवाडी येथे रमेश नाईक या शेतकऱ्याची मळणी चालू असतानाचे चित्र.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      अलिकडील काही वर्षात चंदगड व गडहिंग्लज तालूक्यात उन्हाळी वायंगन भात शेती करत आहेत. सध्या असे भात कापणी व मळणी करण्याचे काम चालू असले तरी यामध्ये सततच पडत असणाऱ्या पावसाचा व्यत्यय येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्थ बनला आहे.

       चंदगड व गडहिंग्लज तालूक्यातील नद्या बारमाही वाहत आहेत . त्यामूळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. याचा परिणाम भात शेती क्षेत्रावर झाला आहे. भाताचे क्षेत्र कमी झाल्याने आता आहे त्याच क्षेत्रात उन्हाळी भात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी चालवला आहे. पावसाळी भात पीक घेतत्या नंतर पुन्हा उन्हाळी भात घेतले जात आहे. 

       या वायंगन भाताला पावसाळी भातापेक्षा उन्हाळी भाताला अधिक उतारा आहे. त्यामूळे नदिकाठ, धरणाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात भात घेतले जात आहे. सध्या हे भात कापणी व मळणीचे काम वेगाने चालू आहे. पण या सर्वामध्ये वारंवार पावसामुळे व्यत्यय येत आहे. त्यामूळे पिंजर वाळवण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. एकंदरीत जूनपूर्वी भात कापणी व मळणी करून पून्हा पेरणीच्या कामामध्ये गुंतला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment