![]() |
चक्रीवादळ |
कोल्हापूर / प्रतिनिधी
कालरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात `तौक्ते` वादळाचा प्रभाव जाणवत होता. रात्रीपासून मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पडत होता. हे वादळ आता रायगड मुंबईच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व साताऱ्यावरील धोका टळला असल्याचे भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
![]() |
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे |
श्री. जोहरे म्हणाले की, `` `तौक्ते` हे वादळ केरळ येथे तयार झाले. कर्नाटकमार्गे ते गोव्याला सरकले. सिंधुदुर्ग, रायगड मुंबईच्या दिशेने सद्यस्थितीला सरकत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा येथील धोका टळला असून पाऊसही आधीपेक्षा कमी होणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याची गतीही कमी होणार आहे. या वादळाच्या परिणामामुळे मुंबईमध्ये रात्री तीन वाजता वारा व पाऊसही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तरीही नागरीकांनी घाबरण्यासारखे काहीही नाही. पालघर परिसरातही या वादळाचा प्रभाव दिसणार आहे. पालघर परिसरातील शेतकऱ्यांचे जे आंबे आहेत. ते आंबे शेतकऱ्यांनी उतरुन घ्यावे. पुणे शहरामध्ये सुसाट्याच्या वाऱ्यासह जोराचा पाऊस पडणार आहे. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी गुजरातला धडकू शकेल असे दिसते.``
ते पुढे म्हणाले, ``चक्रीवादळ तयार होण्यासाठी साधारणता २५० तासाचा कालावधी लागतो. आठ ते दहा दिवस लागतात. १२ तारखेला ही प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु हे अंतर कमी असल्यामुळे हे वादळ वेगाने उत्तरेकडे जात आहे. नागरीकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. आज गोवा राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे घरांची पडझड होवून यामध्ये दोन जणांना मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रामध्ये सह्र्याद्री पर्वत रांगा असल्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही.``
1 comment:
काय वाटेल ते काय सांगता लोकांना...
Post a Comment