कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री (ता. चंदगड) येथील अलगीकरण केंद्रास श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटीच्या वतीने पाच बेड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ऍडजेस्ट टेबल ५ कॉट बेडचे लोकार्पण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने लवकरच या ठिकाणी सर्व प्रथमोपचार साहित्यासह ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एम. जे. पाटील यांनी दिली.
यावेळी सरपंच छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील सप्ताह कमिटीचे अध्यक्ष शंकर पाटील, यल्लाप्पा पाटील, पुंडलिक जोशी आदी सदस्य, तलाठी शुभम मुंडे, दिपक कांबळे, ग्रामसेवक जी एम नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील संगीता कोळी, एन जे बाचुळकर, सटूप्पा पाटील, शशिकांत सुतार, सागर पाटील, नरसु कांबळे आदींची उपस्थिती होती. आठवड्यापूर्वी कोरोना दक्षता कमिटी सदस्य शरद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाव मर्यादित विलगीकरण केंद्राला अशा प्रकारच्या सुविधा देण्याबाबत आवाहन केले होते. त्याला या निमित्ताने मूर्तरूप आहे येऊ पाहत आहे. रुग्णांना पुढील उपचार मिळेपर्यंत गावातच प्रथमोपचार मिळवून देणारा हा उपक्रम इतर गावांना ही दिशादर्शक ठरू शकतो.
No comments:
Post a Comment