चंदगडला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,वादळाने घरे व पोल्ट्रीवरील पत्रे उडाले - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2021

चंदगडला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,वादळाने घरे व पोल्ट्रीवरील पत्रे उडाले

चंदगड / प्रतिनिधी

 अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तोतेक चक्रिवादळाची रूपांतर झाले. या वादळाचा परिणाम  चंदगड तालुक्यालाही बसला. शनिवारी मध्यरात्रीपासून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरू झाला आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे आणि सुरू असलेला  पाऊस याचे समीकरण जुळले, आणि सारे रस्ते आज निर्मनुष्य होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. 

       गेल्या चार महिन्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना कोसळत  असलेल्या पावसाने गारवा दिला. वादळी वाऱ्याने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. वादळी वाऱ्याने काहींच्या घरावरील कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले.उन्हाळी भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  केळीच्या बागा कोलमडून पडल्या, तसेच घरे व पोल्ट्री शेड वरचे पत्रे उडून गेले.  काढणीला आलेले आंबे, फणस गळून पडले. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतात पाणी तुंबल्याने पुर्व मशागतीची कामे काही दिवस थांबवावी लागणार आहेत.



No comments:

Post a Comment