आजरा येथे शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून रोझरी कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2021

आजरा येथे शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून रोझरी कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ

 

आजरा येथे कोविड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी आमदार प्रकाश आंबिटकर, आमदार राजेश पाटील व इतर. 

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       सद्यस्थितीला कोरोना रुग्णामध्ये झालेली प्रचंड वाढ,सरकारी आरोग्य यंत्रणेवर सेवा पुरविताना येणाऱ्या मर्यादा, ऑक्सीजन बेडसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना करावीर लागणारी धावपळ या सर्वांवर पर्याय म्हणून आजरा येथील इंडियन मेडीकल असोसिएशन, महसूल व आरोग्य प्रशासनाच्या संकल्पनेतून शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून रोझरी कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर कोवीड सेंटर संपुर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक आहे.

        यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, सभापती उदय पोवार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्रभाऊ सावंत, प्रांताधिकारी संपत खिलारी, DYSP  गणेश इंगळे, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक अभिषेक शिंपी, तहसिलदार विकास आहीर, डॉ. अनिल देशपांडे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, विजयभाऊ थोरवत, डॉ. फर्नांडीस,  डॉ. श्री. देशमुख, सहा. पोलीस निरिक्षक श्री. भांगे, डॉ. इंद्रजित देसाई, डॉ. गौतम नाईक, डॉ. रश्मी राऊत, इंद्रजित देसाई-वेळवट्टीकर, डॉ. दिपक हारमळकर, डॉ. सागर पारपोलकर, डॉ. बी. जी. पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment