चंदगड नगरपंचायतीने बसवले टायमर काॅटॅक्टर, विजेची होणार बचत - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2021

चंदगड नगरपंचायतीने बसवले टायमर काॅटॅक्टर, विजेची होणार बचत


चंदगड शहरात काॅटॅक्टर टायमर शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा सौ .प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक नेसरीकर,नाईक, हळदणकर, चंदगडकर,ॲड.कडूकर,कांबळे आदी.


चंदगड /  सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड नगरपंचायतीकडून विजेची बचत करण्यासाठी आठ टायमर कॉटॅक्टर बसवले असून यामुळे शहरातील  विजेची बचत होणार आहे. नगरपंचायतीने चंदगड शहरातील आठ ठिकाणी दिवाबत्ती सुरु बंद करणेसाठी टायमर कॉटॅक्टर बसवले. यामुळेचंदगड शहरातील दिवाबत्ती सायंकाळी ६:४५ वाजता सुरु होणार असून सकाळी ६:०० वाजता बंद होणार आहेत. वेळेत दिवाबत्ती सुरु - बंद होणार असल्यामुळे विजेची बचत होण्याबरोबरच मनुष्यबळ वाचणार आहे. टायमर कॉटॅक्टरचे उद्घाटन चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक विजय कडूकर, सचिन नेसरीकर, अभिजित गुरबे, विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर, आनंद हळदणकर, रोहित वाटंगी, झाकीर नाईक, सौ. अनिता परीट, सौ. अनुसया दाणी, सौ. नेत्रदिपा कांबळे, संजय चंदगडकर, श्रीकृष्ण दाणी, कलीम मदार यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. यावेळी नगरपंचायत नगरअभियंता ऋषिकेश साबळे, वरिष्ठ लिपिक राजू शिंदे, यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment