गरजूंना आर्थिक मदतीसाठी निधी जमा करू : प्रा. दीपक बाचुळकर - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2021

गरजूंना आर्थिक मदतीसाठी निधी जमा करू : प्रा. दीपक बाचुळकर

 बेळगावच्या सागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा

बेळगाव : स्क्रीनद्वारे सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक वर्ग.


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 बेळगाव येथील सागर बी. एड. कॉलेजच्या आजी - माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ऑनलाइन संपन्न झाला. माजी विद्यार्थी व पुणे येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक प्रा. दीपक बाचुळकर यांनी प्रास्ताविक करून ऑनलाइन  स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य राजू हळब होते. प्रास्ताविक शरद प्रभू यांनी केले. 

 यानंतर कोरोनाने मृत्यू झालेले माजी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अल्पशा आजाराने निधन झालेले शिक्षक एस. एन. हिडदुगी, कंग्राळी हायस्कूलचे हंनुरकर, 

 माजी विद्यार्थी मोहन गावित (नाशिक) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वानुमते आपल्या ग्रुपमधील गरजवंताला आर्थिक मदत देण्यासाठी निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत तातोबा धामणेकर, चंदन शेलार, संतोष कुंभार, दयानंद पाटील, प्रेमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बाचुळकर यांनी केले. या स्नेहमेळाव्यास बेळगाव खानापूर सह चंदगड तालुक्यातील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा श्रिधर कुलकर्णी, कल्पना धामणेकर, प्रा. के. एम. तारीहाळकर यांनी मार्गदर्शन केले. आभार रमेश पुजारी यांनी मांडले.No comments:

Post a Comment