नेसरी ग्रामपंचायतीला पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे व १५ व्या वित्त आयोगातून नवीन फवारणी मशीन - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

नेसरी ग्रामपंचायतीला पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे व १५ व्या वित्त आयोगातून नवीन फवारणी मशीन

फवारणी मशीनचे पुजन करताना रामचंद्र परिट सोबत सरपंच आशिश साखरे

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

        नेसरी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीला  पं. स. सदस्य विद्याधर गुरबे यांचेकडून १५ वा वित्त आयोग व पंचायत समिती स्तर निधी २०२०-२०२१ मधून फवारणी मशीन देण्यात आले. या मशीनचे पूजन ग्रामपंचायत  सदस्य रामचंद्र परीट यांचे हस्ते झाले. तर उद्घाटन कार्तिक कोलेकर यांचे हस्ते झाले. यावेळी सरपंच आशिष साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, सदस्य नागोजी कांबळे, विलास हल्याळी, हरीश बुवा, महादेव चव्हाण, सोमनाथ तेली, भैरू कांबळे आदींसह ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment