आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या वनअधिकारीपदी प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती, कोण आहेत त्या, जाणून घ्या....... - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या वनअधिकारीपदी प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती, कोण आहेत त्या, जाणून घ्या.......

सौ. स्मिता होगाडे


आजरा / सी. एल. वृत्तसेवा

        गडहिंग्लज वन परिक्षेत्राच्या  वनअधिकारी आजरा या पदावर सौ. स्मिता होगाडे (डाके) यांची पदोन्नती ने नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक १७ मे २०२१ रोजी आजरा वनपरिक्षेत्र चा कार्यभार घेतला. या विभागात प्रथमच एका माहिलेची नियूक्ती होत आहे.

       सौ. स्मिता यांचे शिक्षण बी. एस. सी. झालेले आहे. त्यांनी आपल्या नोकरीची सुरवात दि १ जुलै २००८ रोजी वनपाल पदावरुन केली होती. त्यांनी वनपाल पदाचे १ वर्ष कालावधी चे प्रशिक्षण चिखलदरा येथे पूर्ण केले होते. त्यांनी २००९ ते २०१८ मध्ये सामाजिक वनिकरण विभाग कोल्हापूर व २०१८ ते २०२१ कोल्हापूर वनविभाग मध्ये वनपाल पदावर सेवा बजावली आहे. त्याचबरोबर सौ. स्मिता यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर कोतोलीचा आदर्श वनअधिकारी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी बी. एल. कुंभार, वनपाल गडहिंग्लज यांचेकडून आजरा वनपरीक्षेत्र चा कार्यभार नुकताच स्विकारला.

No comments:

Post a Comment