वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजीत वाघमोडे यांची नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2021

वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजीत वाघमोडे यांची नियुक्ती

 

अभिजीत सुनिल वाघमोडे

चंदगड / प्रतिनिधी    

      वर्ल्ड फॉर नेचर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. शरद चव्हाण यांनी वर्ल्ड फॉर नेचर च्या  कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या पदावर अभिजीत सुनिल वाघमोडे (रा. तिलारीनगर) यांची नियुक्ती केली.

     कारण निसर्ग सेवा व वन्यजीव प्राण्यांसाठी अभिजीत सुनिल वाघमोडे रा. तिलारी नगर, चंदगड. व्यवसायाने हे सहाय्यक अभियंता (तिलारी जलविद्युत केंद्र, तिलारी नगर)कार्यरत असून बऱ्याच वन्यप्राण्यांना जीवदान देण्यात त्यांना यश आले आहे. सातत्याने वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यामुळे प्राणी जगताच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन असे निवडीनंतर वाघमोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 
No comments:

Post a Comment