चार युद्धात दुश्मनांना धूळ चारलेले तेऊरवाडी चे माजी सैनिक कै. भरमा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2021

चार युद्धात दुश्मनांना धूळ चारलेले तेऊरवाडी चे माजी सैनिक कै. भरमा पाटील

चार युद्धात दुश्मनांना धूळ चारलेले तेऊरवाडी चे माजी सैनिक कै. भरमा पाटील ंयांच्या निधनानिमित्त त्यांना वाहिलेली श्रद्धांजली!

भरमा पाटील


 माजी सैनिक कै.भरमा आप्पाजी पाटील जन्मगाव तेऊरवाडी ता.चंदगड जि.कोल्हापुर सध्या रा. मजगाव, बेळगाव ह्यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दि. १४ मे २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. वयाच्या बाराव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरपले. खेळण्या-बागडण्याच्या वयात एक लहान भाऊ व बहिणीची जबाबदारी खांद्यावर पडली. त्या किशोर वयातही न डगमगता एक विवाहित बहीण व दोन भावंडांचा सांभाळ केला. संसाराचा गाडा चालवत असताना प्रसंगी त्यांनी मैलोन मैल दुर भावंडाना घेऊन जाऊन कुटुंबाचा चरीतार्थ चालविला. अशाही खडतर परिस्थितीत शाळेशी नाळ तोडली नाही. स्वतःच्या हुषारीवर परिस्थितीला धैर्याने तोंड देत दहावी पर्यंत शिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनीयर गृप (BEG)मध्ये 270 या नावाजलेल्या रेजिमेंट मध्ये1961ह्या वर्षी भरती झाले. आपल्या प्रेमळ, मनमिळाऊ, व निर्व्यसनी व्यक्तिमत्वामुळे सैन्य दलातही मित्र परिवार जमावला. कुटुंब परिवारातही आदराच्या स्थानी राहिले. तुमंची शिस्तप्रियता तर प्रत्येकावर एक वेगळीच छाप पाडत असे.

 सैन्य दलात भरती झालात आणि आपल्या कर्तव्य निष्टेच्या व स्वतःच्या आत्मविश्वास वर ३२ वर्षे प्रामाणिक व निष्कलंक देशसेवा केली. ह्या देश सेवेमध्ये अनेक युद्धामध्ये भाग घेत प्रत्येक युद्धामध्ये विजयी तिरंगा फडकऊनच मोठ्या अभिमानाने परतले. मग ते युद्ध १९६२ चे भारत चीन असो, १९६५ चे भारत पाकिस्तान असो आणि १९७१ चा भारत बांगलादेश मुक्ती संग्राम असो ह्या प्रत्येक युद्धामध्ये आपण सामील होऊन दुष्मनान धूळ चारली. ह्या सर्व जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे व विश्वासाने पार पाडल्यामुळे भारत सरकारने आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला १९८७ मध्ये भारतीय शांती सेनेमध्ये सामील करून एका युनिट ची धुरा त्यांच्यावर संपविली. जीवाची पर्वा न करता तीसुद्धा पार पाडली.

  अशा अनेक विजयामध्ये सहभागी होऊन भारत मातेचा अभिमान वाढविला. एकामागोमाग शौर्यामुळे अनेक पदावर बढती घेतली.

अनेक शौर्य पदकांच्या साक्षीने आपण शेवटी आँ.कँप्टन या सैन्य दलातील एका प्रमुख अशा पदावर नियुक्त होऊन सन १९९२ मध्ये सन्मानाने निवृत्त झाले. त्यांनी आपल्या भागातील पाहिले आँ.कँप्टन म्हणून मान मिळवला.

 नियतीच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही.जो आवडे सर्वांना तोची आवढे देवाला हेही ह्यावरून नाकारू शकत नाही. आपला सदैव हसतमुख भरमा आप्पाजी पाटील यांची आकस्मिक एक्झिक्ट सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमंता चिरंजीव नितीन व सचिन, सुना सौ पूजा व ज्योती, मुली वंदना नामदेव गवेकर व सौ अंजली मारुती पाटील, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद!


लेखन- श्रीकांत व्ही. पाटील कालकुंद्री, ता. चंदगड


No comments:

Post a Comment