लाॅकडाउन संपले, जणू जिंकलोच, बेफीकीरतेचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2021

लाॅकडाउन संपले, जणू जिंकलोच, बेफीकीरतेचे दर्शन


चंदगड / प्रतिनिधी

     जिल्ह्यातील लाॅकडाऊन मुदत संपल्यानंतर केलेल्या शिथीलतेचा दुरुपयोग करणार-या महाभाग लोकांचे पुन्हा त्याच प्रमाणे दर्शन आज सकाळी सात ते अकरा या वेळेत पाहायला मिळाले, त्यामुळे जीवाची भिती जराही का नाही?हा प्रश्न डोळ्यासमोर दिसून आला, एकीकडे कोरोनाविरूध्द लढणारे तर दुसरीकडे "त्याला काय होतंय,म्हणनारे, असेच चित्र राहीले तर नियम पाळा म्हणून सांगणारे व नियम पाळणारे यांचे होणार काय हा प्रश्न ऐकवला जात आहे.

        चंदगड तालुक्यात आज लाॅकडाऊन शिथीलतेच्या पहिल्या दिवशी चंदगड शहरासह, हलकर्णी,पाटणे फाटा,शिनोळी ,कोवाड,माणगाव,आडकूर इत्यादी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी जणू काय उद्यापासून पुन्हा सर्वच व्यवहार बंद होणार आहेत,कांहीच मिळणार नाही अशी गर्दी झाल्याने पोलीस यंत्रणेने ची तारेवरची कसरत झाली,कांहीं ठिकाणीं वेळ संपल्यावर शटर बंद तर आत ग्राहक पोलिसांच्या निदर्शनास आले, पोलीस वारंवार ठिकठिकाणी सुचेना करत होते.जर का असेच राहीले तर कोरोना विरुद्ध चा हा लढा यशस्वी कसा होईल हा यक्ष प्रश्न आहे.


No comments:

Post a Comment