![]() |
कृष्णा भरमा मेत्री |
मुळचे दड्डी (ता. हुक्केरी) व सध्या बेळगाव, सदाशिवनगर येथील निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा भरमा मेत्री (वय ८३) यांचे शनिवार दि. 29 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री कै. बी शंकरानंद यांचे ते निकटवर्तीय होते.
दड्डीच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी आहे. त्यांच्यामुळे आज अनेकजण उच्च पदावर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात, पत्नी, चार मुलगे, सुना, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त मुख्याध्यापिका द्रौपदी भोसले - मेत्री यांचे ते पती होत. ते दड्डी येथील घटप्रभा अर्बन सोसायटी, बेळगाव येथील सिद्धार्थ सोसायटी व जागृत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक होते. त्यांनी लोकांचा विरोध पत्करून अनेक महिलांचे जटा निर्मूलन कार्य केले आहे. लंडन येथे शासकीय वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. राजू मेत्री, बिम्समध्ये लॅबरोटरीयन म्हणून कार्यरत असणारे संजू मेत्री, संगीत शिक्षक अनिल मेत्री व बेळगाव रेल्वे हॉस्पिटलचे अधीक्षक सुनील मेत्री यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment