मुगळी गावात शुकशुकाट आहे. |
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुगळी (ता. चंदगड) येथील महालक्ष्मी यात्रा रद्द करण्यात आली आहे. देवस्थान समिती, मुगळी ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तेरा वर्षानंतर महालक्ष्मी यात्रा येत्या १८ ते १९ मे रोजी नियोजित होती. तर या आधीही गेल्या वर्षी कोरोनाच्या कारणास्तव यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, सध्या चंदगड तालुक्यासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच शासनाने निर्बंध लागू केले असून जनता कर्फ्यु देखील पुकारण्यात आला आहे. तरी नागरिकांनी शासनाच्या निर्बंधांचा विचार करून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment