चंदगड येथे दिव्यांगाना कोविड-19 प्रतिबंध लसीकरण, जिल्हा परिषद कोल्हापूर समाज कल्याण विभागाचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2021

चंदगड येथे दिव्यांगाना कोविड-19 प्रतिबंध लसीकरण, जिल्हा परिषद कोल्हापूर समाज कल्याण विभागाचा पुढाकार

दिव्यांगांना लस देताना डॉक्टर व अधिकारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील दिव्यांग हे लसीकरण पासून वंचित राहू नये यासाठी दिव्यांग संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रकाद्वारे विनंती केली होती. त्यानुसार शासनाकडून दिव्यांगांना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार चंदगड नगरपंचायत विभाग व ग्रामीण विभाग मार्फत आज सोमवार २१/०६/२०२१ रोजी दिव्यांग लसीकरण कार्यक्रम गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांच्या हस्ते पार पडला.

         यावेळी सभापती चंदगड पंचायत समिती ॲड. अनंत कांबळे,  चंदगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित जगताप, उपनगराध्यक्ष  फिरोज मुल्ला, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने, वैद्यकीय अधिकारी चंदगड डॉ. सचिन गायकवाड, जि प. सदस्य कल्लाप्पा भोगण, सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे, कार्यक्रम प्रमुख अरुणा कांबळे, चंदगड नगरपंचायत सहसमन्वयक राजकुमार देवार्डे, चंदगड ग्रामीण विभाग सहसमन्वयक सुरेश कांबळे व दिव्यांग बांधव तसेच इतर डॉक्टर्स व नर्स स्टाफ उपस्थित होते.  सातापा कांबळे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंदगड विभाग सहसमन्वयक व कार्यक्रम प्रमुख यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

      उद्घाटन कार्यक्रम वेळी परशराम मिलके कोरज, दीपक जुवळी चंदगड, शांताराम कुंभार चंदगड, रमेश गवळी चंदगड व अजिंक्य फडणीस चंदगड या दिव्यांग बांधवांना लसीकरण करण्यात आले. चंदगड तालुक्यातील सर्व दिव्यांगांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. अशाप्रकारे चंदगड पंचायत समिती हॉल येथे दिव्यांग लसीकरण मोहिमेचा उद्घाटन कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment