चंदगडकरानो, बेळगावला जा !! पण ५ ला सर्व दुकाने बंद, ७ नंतर नाईट कर्फ्यू , शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2021

चंदगडकरानो, बेळगावला जा !! पण ५ ला सर्व दुकाने बंद, ७ नंतर नाईट कर्फ्यू , शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन

 


कागणी / सी. एल. वृत्तसेवा

 बेळगाव जिल्ह्यात सोमवारपासून पहाटे ६ ते सायंकाळी ५ या दरम्यान सर्व व्यवहार सुरू मात्र सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ या दरम्यान नाईट कर्फ्यू असून ५ जुलैपर्यंत विकेंड लॉकडाऊन वगळता पहाटे सहा ते सायंकाळी पाच या दरम्यान सर्व व्यवहार सुरू राहतील. मात्र अद्यापही शिक्षण संस्था, मंदिरे, खाजगी क्लासेस, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षण संस्था बंद असल्या तरी शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे औद्योगिक कंपन्यांना केवळ 50 टक्के कामगार घेऊनच काम करावयाचे आहे. शनिवारी व रविवारी या विकेंडला सकाळी ६ ते १० या वेळेत किराणामाल, डेअरी हे सुरू असेल.

 लग्न करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र लग्न आपापल्या घरीच करावयाचे असून 40 लोकांना उपस्थितीची मर्यादा आहे. या लग्न सोहळ्यासाठी तहसिलदारांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:

Post a Comment