संत गजानन पॉलिटेक्निक मध्ये 'जिनिअस 2021'ची स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2021

संत गजानन पॉलिटेक्निक मध्ये 'जिनिअस 2021'ची स्पर्धा उत्साहात

संत गजानन पॉलिटेक्निक
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये कौशल्य सेतू अंतर्गत राज्यस्तरीय जीनियस २०२१ या स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ मे ते ते ४ जून २०२१ पर्यंत करण्यात आले होते सदरच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सहित महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा,बिहार या राज्यांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता एकूण ५७ शाळांमधून ३६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता सदरच्या स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या पहिल्या फेरीत विज्ञान गणित बुद्धिमत्ता या या विषयावर आधारित आधारे बहुपर्यायी साठ प्रश्न ऑनलाइन प्रणालीद्वारे  विचारण्यात आले होते त्यातून ३० विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली ऑनलाइन कॉन्फरन्सद्वारे ३० विद्यार्थ्यांना विज्ञान गणित व बुद्धिमत्ता या विषयावर सर्वोत्तम जीनियस विद्यार्थी निवडण्याच्या दृष्टीने उच्च दर्जाचे प्रश्न विचारण्यात आले त्यातून चार विद्यार्थी विजेते घोषित करण्यात आले जीनियस २०२१ या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ५ जून २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडला सदरच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे विभागाचे उपसचिव माननीय शाहीद उस्मानी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी सांगितले की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले कारणाने विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो अभ्यास केला होता. त्याला न्याय देण्यासाठी जीनियस २०२१ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संस्थेची वाटचाल संस्थेत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली संस्थेमध्ये नव्याने सुरू झालेल्या डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच मेकॅट्रॉनिक्स इंजीनियरिंग या नवीन कोर्स बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व यातून जे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतील त्यांना शैक्षणिक फी मध्ये सवलत देण्याची घोषणा केली .जिनियस २०२१ या स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम क्रमांक साहिल तानाजी वागरे (एस. एम. व्ही. हायस्कूल साळशी), द्वितीय क्रमांक दिग्विजय दगडू कुंभार (किसनराव मोरे हायस्कूल सरवडे), उत्तेजनार्थ संकेत तुकाराम जाधव (वि. दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लज) व श्रेया आनंदा पाटील (महात्मा गांधी विद्यालय बांबवडे) यांना अनुक्रमे ५००१/-रु, ३००१/- १००१/- रु सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲड डॉ. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेश हसबे, प्रा. मंगेश मेणे, प्रा. प्रदीप लोंढे, निलेश करडे व दयानंद सुरंगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या उपप्राचार्या प्रा. रोहिणी पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment