![]() |
डुक्करवाडी (रामपूर) ता.चंदगड येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळा पूजन प्रसंगी सरपंच राजू शिवनगेकर, उपसरपंच मनीषा वर्पे, आर.व्ही ढेरे,ग्रामसेविका जाधव आदी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
डुक्करवाडी (रामपूर) ता.चंदगड येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत समोर शिवशक राजदंड स्वराजगुढी उभारण्यात आली व गावातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या समोर भगवा ध्वज पूजन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत कार्यक्रम पार पाडला. यावेळी जिलेबी वाटप केली.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच राजू शिवणगेकर ,उपसरपंच मनिषा वर्पे, ग्रामपंचायत सदस्य राणबा ढेरे, तानाजी कांबळे, विलास नाईक, दौलत वरपे, नीता गावडे, सावित्री सुतार, विद्या गावडे, संजीवनी कांबळे, ग्रामसेविका सविता जाधव, वसंत तुर्केवाडकर, विलास कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment