![]() |
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात चंदगड तालुक्यात काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. |
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
आज दुपारी चंदगड तालुक्यात काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी संदर्भात जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्वे येथील बेळगाव वेंगुर्ला मार्ग येथील आंदोलनाने काही काळ वाहतूक खोळंबली. भाजप सरकारच्या अन्यायकारक दरवाढीने सर्वसामान्यांच्या जीवनातील अच्छे दिन निघून गेल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी जे. बी. पाटील, राजेंद्र परीट, बाळासाहेब हळदणकर, अभिजीत गुरबे, संदीप नांदवडेकर, उत्तम पाटील, नामदेव नार्वेकर, उदय देसाई यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चंदगड पोलिसांच्या वतीने मोठा फौजफाटा प्रत्येक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी उपस्थित केला होता.
No comments:
Post a Comment