गेले दोन महिने बंद असलेली हेअर कटिंग सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी आता सलून व्यावसायिकच नव्हे तर नागरिकातून सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत पहिली गदा आली ती सलुन दुकानांवर! यामुळे गरीब तसेच ग्रामीण व शहरी भागात भरमसाठ भाड्याच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलून धारकांच्या संघटनांनी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. यासाठी अर्ज विनंत्या आंदोलने केली तथापि शासनाने याला दाद दिली नाही.
सलून बंद असल्यामुळे बहुतांशी नागरिक आवश्यक साहित्य घरी आणून केस कटिंग करत आहेत. तथापि हे सर्वांना शक्य नसल्याने दाढी, मिशा, केस वाढल्यामुळे बहुतांशी पुरुष नागरिकांची स्थिती एकविसाव्या शतकातील अश्मयुगीन मानवासारखी झाली आहे. लॉकडाऊन मुळे बंद सलूनला वैतागलेल्या नागरिकांतून आता शासनाने सलून चालक व ग्राहकांनी मास्क, सॅनिटायझर सह योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना व अटींसह सलून उघडण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment