आयपीएल क्रिकेट शौकिनांसाठी खुशखबर! दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू होणार वाचा कुठे, कधी? - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2021

आयपीएल क्रिकेट शौकिनांसाठी खुशखबर! दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू होणार वाचा कुठे, कधी?

 

ऑनलाईन मिडिया - न्युज डेस्क

        इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल २०२१ चा उर्वरित दुसरा टप्पा घेण्या विषयीचे अडथळे बीसीसीआयने पार केले आहेत. हे उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते पण १५ ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमीरात मध्ये खेळविण्यात येणार आहेत.

      बीसीसीआय आणि अमिरात क्रिकेट बोर्ड यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे सामने आता दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे पार पडणार आहेत. मे महिन्यात भारतात सुरू असलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत खेळाडू कोरोना बाधित होण्यास सुरुवात झाल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. यावेळी ६० पैकी २९ सामने पूर्ण झाले होते. आता उर्वरित ३१ सामने खेळविण्यात येणार असून १५ ऑक्टोबर विजयादशमीला अंतिम सामना होईल. या काळात परदेशी काही स्टार खेळाडू उपस्थिती नसली तरीही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.No comments:

Post a Comment