योग दिनापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस! प्रधानमंत्र्यांची घोषणा - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2021

योग दिनापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस! प्रधानमंत्र्यांची घोषणा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑनलाईन मिडिया / न्युज डेस्क

           २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून देशातील १८ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी राज्यांना मोफत लस पुरवणार आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दिली.

          लॉकडाऊन चे नियम शिथिल करण्यात आले असले तरी सर्वांनी दक्षता पाळावी. देशातील ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य पुरवणार, मोफत लसीकरणाची गती वाढवणार, केंद्र सरकार ७५ टक्के लस खरेदी करून राज्यांना पुरवणार, मात्र खाजगी रुग्णालयात लसीसाठी शुल्क आकारले जाणार, नाकाद्वारे द्यायच्या लसीची चाचणी देशात सुरू असून लहान मुलांसाठीच्या दोन लसींची चाचणी सुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोना विरोधातील लढ्यात लस हेच मुख्य सुरक्षा कवच आहे; त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी. कोरोना ही गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठी महामारी आहे. त्यामुळे सर्व आघाड्यांवर सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. देशाच्या इतिहासात वैद्यकीय ऑक्सिजनची इतकी गरज कधीही भासली नव्हती ही गरज भागविण्यासाठी युद्धपातळीवर काम केल्याने आपण यशस्वी ठरलो आदी मुद्द्यांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.




No comments:

Post a Comment