महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरोना सेंटरला 21 हजारांची मदत, कोठे व कोणी केली हि मदत......वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरोना सेंटरला 21 हजारांची मदत, कोठे व कोणी केली हि मदत......वाचा......

 

बेळगाव : धनादेश देताना अशोक पाटील. शेजारी महावीर मजगावकर, राजीव साळुंके, जगदीश पाटील, दत्तात्रय जाधव आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       बेळगाव, कोर्ट कंपाउंड येथील एक्स नेव्ही पर्सनल असोसिएशनच्या वतीने व अध्यक्ष, निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील (मूळ गाव, कालकुंद्री, चंदगड) यांच्या पुढाकाराने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण  समितीच्या कोरोना सेंटरला २१ हजार रुपयांची मदत दिली. 

         सामाजिक कार्यकर्ते मदन बामणे यांच्याकडे सदर धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले, ``बेळगावच्या एक्स नेव्ही पर्सनल असोसिएशनने नेहमी बेळगावकरांच्या अडीअडचणी वेळी मदत करत आहे. दोन वर्षापूर्वी  महापूरावेळी बेळगाव, चंदगड या तालुक्यात आम्ही मदत केली असून आगामी काळातही आम्ही मदतीचा हात पुढे करू.`` यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष महावीर मजगावकर, सेक्रेटरी राजीव साळुंके, ज्येष्ठ सल्लागार जगदीश पाटील, इव्हेंट चेअरमन दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. मदती बद्दल श्रीकांत कदम यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment