आरक्षणाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकेला चंदगड तालुका मराठा समाजाचा पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

आरक्षणाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकेला चंदगड तालुका मराठा समाजाचा पाठींबा

चंदगड तालूका सकल मराठा समाजाची बैठक संपन्न 

कारवे (ता. चंदगड) येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना प्रा. दिपक पाटील.

चंदगड / प्रतिनिधी  

      मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी खास संभाजीराजे जी भुमिका घेतील त्यानुसार अंदोलनाची दिशा ठरवली जाईल दि. ६ जून रोजी  होणाऱ्या प्रति  शिवराज्याभिषेक सोहळ्यात पारगड येथील भवानी मातेच्या मंदिरात मशाल प्रज्वलित करून उग्र आंदोलनाला पुन्हा सुरुवात करत असल्याचा एकमुखी निर्णय  चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. 

       कारवे ता चंदगड  येथील महात्मा फुले विद्यालय येथे  कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तालुक्यातील काही मोजक्याच कार्यकर्त्याच्या  उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 

शिव पुतळ्याचे पूजन एम. एम. तुपारे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी गोविंद पाटील यांनी प्रास्ताविक करून मराठा समाजाकडे श्रीमंत नाहीत. माथाडी कामगार, हमाल आणि अधिक शेतकरी आहेत. त्यामुळेच हा समाज इतर समाजांच्या पाठीमागे राहिला आहे. गुणवत्ता असूनही आमचा विद्यार्थी मागे राहिला असल्याचे सांगितले . 

प्रा दीपक पाटील यांनी आण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये आरक्षणाला सुरुवात केली. आणि निराशेने  आत्महत्या केली. एक मराठा लाख मराठा मरणाला भिणारा नाही. त्यामुळे या पुढची आंदोलने ठोक आणि उग्र असतील. आपली  १३५ कोटी लोकसंख्या झाली आणि जगणे मुश्किल झाले आहे. पिकवले तर विकता येत नाही.  संपूर्ण जगाला झालेल्या  मोर्चानी  शिस्त शिकवली. तेच मोर्चे आता केंद्र सरकारला धडा शिकवतील असे सागितले.

    यावेळी सरपंच शिवाजी तुपारे, सरपंच विष्णू गावडे, एम. एम. तुपारे, गोविंद पाटील, राजू पाटील, विनायक गडकरी, प्रशांत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली .यावेळी मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.  No comments:

Post a Comment