दारू वाहतूक करणारे चंदगड तालुक्यातील दोघे ताब्यात, पोलिसांची चोरट्या दारू विरूद्ध मोहीम, कोठे वाचा सविस्तर.......... - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2021

दारू वाहतूक करणारे चंदगड तालुक्यातील दोघे ताब्यात, पोलिसांची चोरट्या दारू विरूद्ध मोहीम, कोठे वाचा सविस्तर..........

दोडामार्ग (प्रतिनिधी)

         गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग तालुका मार्गे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू बेळगांव कोल्हापूरकडे चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू होती. दोडामार्ग पोलीस ठाण्यात नुकत्याच रुजू झालेल्या लेडी सिंघम पो. नि. आर. जी. नदाफ यांनी या बेकायदा दारू वाहतूकी विरूद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.

       सोमवारी रात्री सासोली, हेदूसवाडी येथे गोवा येथून दारु वाहतूक करणारी कार दारुसह जप्त करुन दोघांना अटक केल्याची माहिती पो. नि. नदाफ यांनी दिली.

      याबाबत ची अधिक माहिती अशी, कोरोना लाॅकडाऊन काळात गोवा येथून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू दोडामार्ग येथून वाहतूक केली जात आहे. सोमवारी सायंकाळी चंदगड तालुक्यातील तुकाराम वैजू सुपल, वय २७ वर्षे, रा.माडवळे- तुर्केवाडी व वैभव विठोबा चव्हाण, करेकुंडी हे दोघे पांढऱ्या रंगाची कार (MH 09 AQ 7050) मधून दारूचे बॉक्स भरून घेऊन जात असल्याची खबर नदाफ यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सासोली हेदूसवाडी येथे ही कार अडवून तपासणी केली असता गोवा बनावटीचे विविध कंपन्यांचे दारु बाॅक्स आढळून आले. कार व दारू असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस पांगम यांनी दिली असून वरील दोघा संशयितां विरोधात दोडामार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार. 

      आर. जी. नदाफ यांनी कळणे, फोंडये, डोंगरपाल, दोडामार्ग, धाटवाडी, तिलारी कालवा, तसेच विजघर केंद्र पुनर्वसन येथून होणाऱ्या गोवा बनावटीची दारू वाहतूकीला आळा घालावा अशी मागणी होत आहे. 


No comments:

Post a Comment