आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पाटणे वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2021

आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पाटणे वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप


पाटणे (ता. चंदगड) येथे वृक्षारोपण करताना आमदार राजेश पाटील, बाजूला वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल भांडकोळी, धामणकर आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         पाटणे (ता. चंदगड) येथील वनपरिक्षेत्रामधील ३२ वनकर्मचारी याना आम राजेश पाटील  हस्ते जंगल फिरती युनिफॉर्म (गणवेश), प्रथमोपचार, फायबर स्टीक व एलईडी बॅटरी आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.प्रारंभी आम हस्ते ५ रोपांचे पुजन करणेत आले. त्यानंतर आवारात वृक्षरोपन करणेत आले. 

       प्रास्तविक वनपाल नेताजी धामणकर यांनी केले. यावेळी आमदार पाटील यांनी या वन कर्मचाऱ्यांना दिलेल्या आधुनिक साहित्यामुळे वन कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळणार असुन टीमवर्क चांगल्या प्रकारे होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.

       कार्यक्रमाबाबत प्र.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी माहिती दिली. वनरक्षक सौ. माणिक खोत, वनरक्षक सदाशिव तांबेकर, वनसेवक शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. आभार वनपाल बी. आर. भांडकोळी यांनी मानले. यावेळी आमदार पाटील यांनी तिलारी वनक्षेत्रात फेरफटका मारला व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. 

No comments:

Post a Comment