श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे (बेळगाव) आंबेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2021

श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे (बेळगाव) आंबेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा

श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे (बेळगाव) आंबेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे (बेळगाव) आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या मण्णूर गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या जवळपास 300/400 महिलांनी आपल्या तक्रारी घेऊन आंबेवाडी ग्रामपंचायतीवर विराट मोर्चा काढला होता. 

       या मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या बसवंत कोले, सुधिर काकतकर, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल देसाई व राहुल पाटील यांनी केले होते, हा मोर्चा जेष्ठ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनानुसार काढला होता.  पिडिओ इंदिरा गानगेर व इंजिनीयर अक्षय चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात निवेदन स्विकारले तेव्हां श्रमिक अभिवृद्धी संघटनेतर्फे लक्ष्मी होनगेकर, सुरेखा मंडोळकर, यशोदा गोविंदाचे, उर्मिला काकतकर, लक्ष्मी कदम, राजश्री जैन व ग्रामपंचायत सदस्य जयश्री तोरे या गटप्रमुखांनी मण्णूर गावातील महिलांच्यावतीने तक्रारी मांडल्या, यावेळी लक्ष्मी कदम, रेखा तरळे, मालू शहापूरकर, उर्मिला चौगुले, सविता चौगुले, मालू मंडोळकर, सुनिता काकतकर व रेखा पाटील या कायकबंधूसह मोठ्या संख्येने मण्णूर गावातील रोजगारावरील महिला उपस्थित होत्या. मोर्चानंतर राहुल पाटील व बसवंत कोले यांनी महिलांची बैठक शेजारील दक्षिण महाराष्ट्र मंडळ आंबेवाडी हायस्कूलच्या पटांगणात घेऊन त्यांच्या कामासंदर्भात अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.



No comments:

Post a Comment