पंचायत समितीच्या वतीने नगरगाव प्राथमिक शाळेला शालोपयोगी साहित्याचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2021

पंचायत समितीच्या वतीने नगरगाव प्राथमिक शाळेला शालोपयोगी साहित्याचे वितरण

पंचायत समितीच्या वतीने नगरगाव प्राथमिक शाळेला शालोपयोगी साहित्य देताना सभापती ॲड. अनंत कांबळे, गटविकास अधिकारी सी. ए. बोंडरे,  गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे व इतर.  

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       नगरगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या वतीने अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मराठी विद्यामंदिर नगरगाव शाळेला सभापती ॲड. अनंत कांबळे, गटविकास अधिकारी सी. ए. बोंडरे,  गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे  यांच्या हस्ते शाळेला वॉटरफिल्टर, प्रयोगशाळा साहित्य, ग्रंथालय पूरक साहित्य व क्रीडासाहित्य यांचे वितरण करण्यात आले.

       यावेळी सभापती ॲड. कांबळे यांनी `शाळेसाठी व गावासाठी 15 व्या वित्त आयोगातून दुरुस्ती तथा इतर कामासाठी निधी देणार असल्याचे सांगितले. `

          गटविकास अधिकारी श्री. बोंडरे यांनी `शाळा दत्तक घेतली असून अश दुर्गम डोंगराळ भागातील शाळेसाठी शासनाबरोबरच इतर माध्यमातून येणाऱ्या निधीतून शाळेसाठी अनुदान देऊ असे सांगितले.`

         गटशिक्षण अधिकारी सौ. सुभेदार `जुन्या इमारतीचे निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.` सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून अशा डोंगराळ भागातुन आल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.  यावेळी नगरगाव शाळेचे शा. व्य. क. अध्यक्ष संजय सांबुद्रकर, उपाध्यक्ष नामदेव यमेंटकर, पुंडलिक यमेंटकर, शांताराम यमेंटकर व शाळेचे मुख्यध्यापक पी. एम. गुरव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment