महागाव येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात शाहू महाराज जयंती - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2021

महागाव येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात शाहू महाराज जयंती

महागाव येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात लोकराजा शाहू महाराज यांची १४६ वी जयंती कोरोना पार्श्वभूमीवर साध्यापणाने साजरी करण्यात आली.

      महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. मंगल मोरबाळे यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी प्राचार्या डॉ. मोरबाळे यांनी शाहू महाराजांनी केलेले  सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य कार्याविषयी तसेच त्यांची दूरदृष्टी व राज्यकारभाराची माहिती दिली. 

         यावेळी डॉ. संगीता  मनगुळे, सदाशिव घटग्यानावर, दिपक जोंधळे, श्रावण बसाण, प्रिया देसाई, उर्मिला शेवाळे, विद्या फुटाणे, वैशाली डोमणे, हर्षला पाटील, रूपा कांबळे, पाडुंरंग मगदूम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment