ओबीसी फाउंडेशनच्या तालुका अध्यक्षपदी कृष्णा बामणे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2021

ओबीसी फाउंडेशनच्या तालुका अध्यक्षपदी कृष्णा बामणे यांची निवड

कृष्णा बामणे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        निट्टूर (ता. चंदगड) येथील कृष्णा जोतिबा बामणे यांची ओ बी सी सेवा फाउंडेशन कोल्हापूरच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या बामणे यांची जिल्ह्यातील अलुतेदार, बलुतेदार, कारागीर व सेवाकरी समाजाप्रती असलेली तळमळ पाहून त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे जिल्हाअध्यक्ष शिवाजीराव माळकर, संघटक दिगंबर पाटील, पी ए कुंभार आदींनी ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व संविधानिक हक्कांसाठी बामणे यांनी कार्य करावे अशा शुभेच्छा निवडीचे पत्र देताना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment