पाटणे फाटा येथील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट, मजरे कार्वे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2021

पाटणे फाटा येथील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट, मजरे कार्वे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून आयोजन

मजरे कार्वे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून पाटणे फाटा येथील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली.

मजरे कार्वे / प्रतिनिधी

       मजरे कार्वे, तावरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या सर्व व्यावसाईकांची रॅपीड अँटिजेंन टेस्ट पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात घेण्यात आली.

       पाटणे फाटा हे वर्दळीच ठिकाण. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत येथे तुफान गर्दी असते. कोरोना काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत व्यवसाय सुरू आहेत.  मात्र काही ठिकाणी गर्दी वाढत असल्याने येथून संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून ही टेस्ट करण्यात आली. प्रारंभी कार्वेचे सरपंच शिवाजी तुपारे, तलाठी राजश्री पचंडी, उपसरपंच पांडुरंग बेनके, ग्रामसेवक शिवाजी दुंडगेकर यांच्या उपस्थितीत या टेस्टची सुरुवात करण्यात आली. माणगाव आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. अरविंद पठाणे यांच्या नेतृत्वाखालील टीमने उपस्थित व्यापाऱ्यांची टेस्ट केली. 

                                                   जाहिरात

जाहिरात

या वेळी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोणामुक्त गाव स्पर्धेत भाग घेऊन आमचा गाव कोरोणामुक्त करणार असल्याचे माजी उपसरपंच निवृत्ती हारकारे यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाकडून प्रशांत वेदपाठक, तुषार बागडी, एस. जी. दळवी, जे. जे. माने, रेश्मा पाटील, संपदा पाटील, शशिकला पाटील, पूजा बिर्जे आदी आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशास्वयंसेविका यांनी टेस्टिंग केले. या व्यावसायिकांचे टेस्टिंग केल्याने मजरे कार्वे व तावरेवाडी ग्रामपंचायतींचे कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment