![]() |
देवरवाडी ग्रामपंचायत व प्रिन्स पाईप कंपनीकडून गावात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
देवरवाडी (ता. चंदगड) येथील प्रिन्स पाईप कंपनी व ग्रामपंचायत देवरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
प्रिन्स कंपनीने कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या परिसरातील अन्य मोठ्या कंपन्यांनी याचे भान ठेवून आपणही सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन देवरवाडी ग्रामपंचायत मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात
प्रिन्स कंपनीने दाखविलेल्या या सामाजिक औदर्याचे गावातील गोर-गरीब लोकांकडून ऋण व्यक्त होत आहेत. यावेळी ग्रामपंचायत देवरवाडी सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, ग्रामपंचायत सदस्य मंजुळा कांबळे, मनिषा भोगण, प्रभावती मजूकर व ग्रामसेवक श्री. नाईक तसेच कंपनीचे एच आर कल्लापा कोकितकर, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment