रस्ता व ग्रामीण रुग्णांलयाबाबत नगरसेवकांनी काय केली पालकमंत्र्यांच्याकडे मागणी? वाचा............ - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

रस्ता व ग्रामीण रुग्णांलयाबाबत नगरसेवकांनी काय केली पालकमंत्र्यांच्याकडे मागणी? वाचा............

रस्ता व ग्रामीण रुग्णांलयाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           बेळगाव वेंगुर्ला कासार सडा माईन्स कडे जाणारा रस्ता हिंदाल्को कंपनीचा मालकीचा आहे. तो शासनाकडे वर्ग करावा. तसेच चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात सुविधांच्या उणिवा आहेत. तज्ञ डॉक्टर, अपूर्ण साधनसामुग्री या कारणांमुळे आरोग्याचा दृष्टीने रुग्णांची हेळसांड होते. बेळगाव व गडहिंग्लजला उपचारासाठी जाणे सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर व नगरसेविका मुमताजबी सुलेमान मदार यांनी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

          चंदगड माईन्सकडे जाणारा रस्ता चंदगड नगर पंचायत चार तीन नंबर  मध्ये समावेश आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.  जागोजागी खड्डे पडले आहेत. नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करताना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षापासून  बॉक्साईट  उत्खनन बंद आहे. त्यामुळे हा रस्ता वापरात नसल्याने हिंडाल्को कंपनीने हा  रस्ता दुरुस्ती केलेली नाही. रस्ता मात्र कंपनीच्या मालकीचा असल्यामुळे शासनाकडून निधी लावण्याचा मर्यादा आहेत. नागरिकांची गरज विचारात घेऊन हा रस्ता शासनाकडे वर्ग करावा व त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी  यावेळी करण्यात आली. तसेच चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयाला तज्ञ डॉक्टर व साहित्य-सामग्री देण्यात यावी या मागणीसाठी नुकताच पालकमंत्री बंटी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment