मैत्री दिनानिमित्त तुर्केवाडीच्या वर्गमित्रांनी केली मदत, कोणाला व कशासाठी......वाचा....... - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

मैत्री दिनानिमित्त तुर्केवाडीच्या वर्गमित्रांनी केली मदत, कोणाला व कशासाठी......वाचा.......

मैत्री दिनानिमित्त तुर्केवाडी येथील मित्रांच्या कुटुंबियांना मदत देताना वर्गमित्र.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           कोरोनाने आपल्याला सोडुन गेलेल्या वर्गमित्राच्या कुटुंबाला जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून व मुलगा शिवतेजच्या पहील्या वाढदिवसाचे चे निम्मीत साधुन आर्थिक मदत व्हावी यासाठी जनता विद्यालय २००३ चे वर्गमित्र सरसावले. त्यांनी २०  हजारांची मदत व विमा पावती त्यांच्या पत्नीकडे सुपुर्द केली. या वर्गमित्रांच्या यारी दोस्तीतुन मित्रच मित्राच्या काही कामी येऊ शकतो हे दाखवून देत एकजुटीची व माणुसकीची शिकवण दिली.

          तुर्केवाडी (या. चंदगड) येथील राहीवाशी शिवभक्त ज्ञानेश्वर राशिवडेकर यांचे मागील महीन्यात निधन झाले. कुंटुंबातील कर्ते उमदे नेतृत्व असलेले परंपरागत केशकर्तनालयाच्या व्यवसायातुन आपल्या कुटुंबाचा आर्थिक कणा असलेले, उमद्या वयात अचानक सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अवघ्या एक वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण यांना सर्वांना सोडून त्याने जगाचा निरोप घेतला. एक सच्चा शिवभक्त नावाने तो पंचक्रोशीत ज्ञात होता. छ्.शिवाजी महाराज व शंभुराजेंचा अश्वारूढ पुतळा, दुर्गा माता दौड, हिंदु संघटन, शिवजयंती आदी व सार्वजनिक कार्यात त्यांनी लहान वयात प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांच्या अशा जाण्याने गावांमध्ये  मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. सारा गाव हळहळला. त्याचे योगदान कायम स्मरणात रहावे,त्याच्या कुटुंबीयांना या दुखातुन सावरण्यासाठी 'मस्ती की पाठशाला'या व्हाटसग्रुप वर वर्गमित्र जनता विद्यालय २००३ च्या माध्यमातून *एक हाथ मदतीचा -आपल्या मित्राच्या आठवणीला..*या मथळ्याखाली मदतीचे आवाहन केले. त्याला सर्वच स्तरातील संवगड्यानी प्रतिसाद देऊन वर्गमित्र, मैत्रींनीनी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर, महापुरकाळात ही आपली मदत पोहचवण्यात पुढाकार घेणार्या वर्गमित्रांनी याही कार्यात हिरारीने सहभाग घेतला. मैत्री दिनाचे औचित्य साधून कै. ज्ञानेश्वरच्या मुलांच्या पहील्या वाढदिवसादिनी त्याच्या नावे सहकारी बँकेमधील २० हजारची दामदुप्पट ठेव पावती व पत्नी सुजाता यांच्या नावे HDFC Ergo चा १५०००० च्या पाॅलीसीच्या प्रमाणपत्र क्लासमेंट प्रतिनिधींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विनोद पाटील, रविंद्र कोनेवाडकर, सत्यजीत मळवीकर, महेश बसापुरे, गुंडू तरवाळ, विकास कांबळे, राजु कदम, प्रकाश ऐनापुरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment