पाटबंधारे विभागाकडून भोगोली बंधाऱ्याची सफाई - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2021

पाटबंधारे विभागाकडून भोगोली बंधाऱ्याची सफाई

 

भोगोली बंधाऱ्याची जेसिबीच्या साह्याने सफाई करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा 
पुरामुळे भोगोली (ता. चंदगड) येथील  बंधाऱ्यामध्ये अडकलेली झाडे पाटबंधारे विभागाने काढून टाकून सफाई केली.
        मागील आठवड्यात आलेल्या पुरामधून मोठया प्रमाणात झाडे व झुडपे वाहत येऊन भोगोलीच्या बंधाऱ्यामध्ये येऊन अडकली होती . यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता . यानंतर उपविभागीय अधिकारी चंदगड , पाटबंधारे विभाग चंदगड चे तुषार पवार यांच्या आदेशानुसार भोगोली बंधारा सच्छ करण्यात आला. जेसीबीच्या साह्याने बंधाऱ्यामध्ये अडकलेली सर्व झाडे काढण्यात आली. यावेळी मोजणीदार रणजित गरूड, बिटधारक शिवाजी कांबळे , परशराम ढबे , संतोष शिंदे भोगोलिचे सरपंच रामू गावडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .No comments:

Post a Comment