महाराष्ट्र एकीकरण समितीने केले वृक्षारोपन - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2021

महाराष्ट्र एकीकरण समितीने केले वृक्षारोपन

 

महाराष्ट्र एकीकरण समितीने केले वृक्षारोपन करण्यात आले.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वृक्षारोपण करून 21000 वृक्ष लागवड संकल्पाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगिकरण केंद्राच्या सुरूवातीला बेळगावसह तालुक्यात दो 21000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता त्यानुसार आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे आज वृक्षारोपण करून संकल्पाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके यांनी सर्व गावोगावी सर्वानी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे आणि मागील काही वर्षात भरमसाठ वृक्षतोड झाली आहे ती पोकळी भरून काढत पुन्हा एकदा बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर बनविण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी महादेव पाटील, मदन बामणे, अनिल हेगडे, बाळू जोशी, सुरज कुडूचकर, श्रीकांत कदम, सागर पाटील, मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, अश्वजित चौधरी, विनायक कावळे, आशीर्वाद सावंत, विक्रांत लाड, आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment