सातवणे सजातील तलाठी स्वाती चोपडे यांची बदली करण्याची मागणी, कोणी केली हि मागणी...... - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2021

सातवणे सजातील तलाठी स्वाती चोपडे यांची बदली करण्याची मागणी, कोणी केली हि मागणी......

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         सातवणे (ता. चंदगड) येथील सजातील गावकामगार तलाठी स्वाती चोपडे या सतत गैरहजर राहत असून नागरिकांशी उध्दट वागत असल्याने त्यांची बदली करावी अशी मागणी या सजातील शेतकरी वर्गातून होत आहे. याबातचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

         निवेदनात म्हटले आहे की, ``तलाठी चोपडे या सातवणे सजामध्ये वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. हजर झाल्यापासून आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचे काम पूर्ण केलेले नाही. सरकारी करापोटी पैसे घेतात पण पावती देत नाहीत. फोन केला तर उचलत नाहीत, कधी सजात आल्याच तर उध्दट उत्तरे देतात. तलाठी चोपडे यांच्यामुळे हेरे संरजाम बाबतीतील प्रकरणे, खरेदी-विक्री, उत्पन्नाचे दाखले, फेरफार, कर्जप्रकरणे आदी कामे प्रलंबित आहेत. आज पर्यंत सातवणेसह केरवडे, वाळकुळी, आसगोळी, केंचेवाडी या पाच गावातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कामचुकार श्रीमती चोपडे तलाठी यांच्यावर कारवाई करावी व सातवणे सजात कार्यक्षम नवीन तलाठी नेमावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अडकूर विभाग अध्यक्ष सुरेश कूट्रे, गणपत गावडे, नामदेव पारसे, सुरेश माने, बयाप्पा पारसे, अशोक माने,  जयराम मासरणकर, विशाल जाधव, अजित पाटील, संदीप पाटील, सागर पाटील आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:

Post a Comment