मुसळधार पावसावेळी येणाऱ्या ओढ्याच्या पाण्यापासून सावधान...... - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

मुसळधार पावसावेळी येणाऱ्या ओढ्याच्या पाण्यापासून सावधान......

तळगुळी येथील ओढ्यावर आलेले पाणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा   

      गेल्या तीन -चार दिवसापासून धुवांधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गही बंद झाले आहेत. शेता-शिवारातून पाणी वाहू लागल्याने ओढे-नाले तुडुंब भरुन प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक ओढ्यांचे पाणी रस्त्यावरुन जात असल्याने चित्र आहे. 

 जोराचा पाऊस आला की, ओढ्याचे पाणी रस्त्यावर येते. या ओढ्याच्या पाण्याला प्रचंड वेग असतो. पाऊस कमी झाला की ओढ्याचे पाणीही कमी होते. पण अनेक अतिउत्साही प्रवाशी ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट न पाहता अशा वाहत्या पाण्यातून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जीविताला धोका निर्माण होतो. पाण्याला वेग असल्याने हि वाहतुक अधिक धोकादायक होते. त्यामुळे प्रवाशांनी ओढ्याच्या पाण्यापासून खबरदारी घेण्याची गरज आहे. 

       सुळये, नांदवडे, कोनेवाडी, हिंडगाव, निट्टूर, घुल्लेवाडी, कालकुंद्री, तळगुळी, होसूर यासह तालुक्यातील अन्य ओढ्याच्यावर दरवर्षी मोठ्या पावसात ओढ्यावरुन पाणी येते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना खबरदारी घ्यावी. 



No comments:

Post a Comment