सलग दुसऱ्या दिवशीही पुरस्थिती जैसे थे, वादळी पावसाची संततधार सुरुच, दोन घराची पडझड, तीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

सलग दुसऱ्या दिवशीही पुरस्थिती जैसे थे, वादळी पावसाची संततधार सुरुच, दोन घराची पडझड, तीन लाखांचे नुकसान

चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड रस्त्यावर आलेले पाणी. 

संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

  गेले तीन-चार दिवस पावसाची धुवाँधार बॅटींग सुरु आहे. त्यामुळे काल सकाळपासून अनेक बंधारे पाणीखाली गेले आहेत. आजही पुरस्थिती जैसे थे आहे. त्यातच जांबरे परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळीच जांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे जांबरे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचा धोका आणखी वाढला आहे. आज दिवसभरात माणगाव येथील सुभद्रा कांबळे यांच्या भिंत कोसळून अंदाजे ६० हजारांचे तर मौजे राजगोळी बुद्रुक गावातील सौ. नंदा शिवाजी सुतार यांचे राहाते घर पुर्णपणे पडले. त्यामुळे अंदाजे २ लाख ५० हजार रुपये नुकसान झाले आहे. 

         तहसिल कार्यालयातील आपत्ती विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात  तालुक्यात सरासरी १११.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय पाऊस आजचा पाऊस व कंसात एकूण पासून – चंदगड १२३ (५९९), नागनवाडी १७८ (३९७), माणगाव ६८ (१७१), कोवाड ३८ (२५६), तुर्केवाडी १४३ (५६६), हेरे १२१ (७३७). आज सकाळपर्यंत नागनवाडी सर्कलमध्ये सर्वांधिक १७८ मि. मि. तर सर्वांत कमी कोवाड सर्कलमध्ये ३८ मि. मी झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास सकाळपर्यंत चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलही पाण्याखाली जावून हा मार्ग बंद होण्याची आहे. 

चंदगड तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठी प्रकल्पाचे नाव व कंसात टक्केवारी  - 

तालुक्यातील सर्व प्रकल्पाची एकूण टक्केवारी सरासरीमध्ये – ६४.५८

मध्यम प्रकल्प - घटप्रभा (१०४.९१), जांबरे (१००.00) व जंगमहट्टी (३६.७६) 

लघु पाटबंधारे प्रकल्प - आंबेवाडी (४४.१८), दिंडलकोप (३३.८०),  हेरे (१७.२९), जेलुगडे (२६.७१), कळसगादे (१६.५६), करंजगाव (३४.७१), खडकओहोळ (२२.१९), किटवाड क्र.1 (३७.२७), किटवाड क्र.2 - (४२.५४), कुमरी (६७.९५), लकिकट्टे (६२.७५), निट्टूर क्र.2 (२९.२१), पाटणे (३४.४२), सुंडी (३६.३३), काजिर्णे (७४.११).



No comments:

Post a Comment