शेडवरील पडलेला पत्रा. |
माणगाव (राजेंद्र शिवणगेकर)
आंबोली चेकपोस्टवर कोरोणा सेवांतर्गत तपासणीसाठी नाईट ड्युटी करताना वादळी वाऱ्यात शेडच्या छताचा पत्रा कोसळल्या मुळे ड्युटीवरील आंबोली जकातवाडीचे शिक्षक अनिलकुमार चाळुचे यांच्यासह अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून सेवा न बजावण्याचा पवित्रा घेतला आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली चेकपोस्टवर कोरोणा सेवांतर्गत तपासणीसाठी नाईट ड्युटी करताना काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात रात्री 1:30 वाजता ड्युटीवर असल्यास शेडच्या छताचा पत्रा कोसळल्याने ड्युटीवर असणारे जकातवाडी शाळेचे शिक्षक अनिल कुमार चाळुचे यांच्यासह अन्य दोघे जखमी झालेत. त्यामुळे शिक्षक संघटनांनी धोकादायक परिस्थितीत काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. अनिल कुमार चाळुचे यांच्यासह सूर्यकांत निर्मळ काशिनाथ हसबे हे सेवा बजाज होते. या वेळी जोरदार वारा पाऊस सुरू होता. तसेच वीज ही गेली होती. अशातच प्रशासनाने ऊभा केलेल्या शेडमध्ये रात्री पहारा देत असताना अचानक जोराच्या वार्यामुळे शेडचे वरचे दोन पत्रे खाली बसलेल्या अनिल कुमार चाळुचे यांच्या अंगावर पडले. त्याचा लगेच चेकपोस्टवर सेवा बजावत असलेल्या पोलीस आणि अन्य शिक्षकांनी त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. चेक पोस्ट वरील शिक्षकांची नाईट ड्यूटी रद्द करण्याची वारंवार विनंती करूनही सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला याबाबत शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment