हुंदळेवाडी येथील राष्ट्रीय खेळाडू सुरज देसाई नायब सुभेदारपदी - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

हुंदळेवाडी येथील राष्ट्रीय खेळाडू सुरज देसाई नायब सुभेदारपदी

सुरज देसाई

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

               हुंदळेवाडी (ता. चंदगड) या गावचे सुपुत्र, राष्ट्रीय कब्बडीपटू सुरज शिरीष देसाई यांची सैन्यदलामध्ये नायब सुभेदार म्हणून पदोन्नती झाली. ते सध्या पुणे येथील बॉम्बे इंजीनियरिंग सेंटर मध्ये कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी चित्रपट अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या जयपुर पिंक पॅंथर या या कबड्डी संघासाठी ८ लाखांची बोली मिळवली होती. तर या नंतरच्या प्रो कबड्डीसाठी दिल्ली दबंग या संघा कडून ५२ लाखांची बोली मिळवली होती. त्यांना वडील शिरीष देसाई यांच्यासह अन्य क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले. सुरज यांचे लहान भाऊ सिद्धार्थ यांना ही यु मुंबाकडून ३६ लाख रुपयांची तर तेलुगु टायटन कडून १ कोटी ४५ लाख रुपयांची बोली घेतली आहे. सुरज यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment