अडकूर येथे मुसळधार पावसामुळे गटर तुंबल्याने गटारीचे पाणी व कचरा रस्त्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2021

अडकूर येथे मुसळधार पावसामुळे गटर तुंबल्याने गटारीचे पाणी व कचरा रस्त्यावर

अडकूर (ता. चंदगड) मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे तुंबलेले गटर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      अडकुर (ता. चंदगड) येथील बाजारपेठेतील मुख्य स्टॅँडवर संततधार पावसामुळे गटारे तुडुंब भरल्याने गटाराची पाणी कचरा, पाण्याच्या बाटल्या व प्लॅस्टीक रस्त्यांवर आले. पावसाळ्यापूर्वी या गटाराची सफाई करणे गरजेचे होते. मात्र ते न झाल्याने मुसळधार पाऊस होवून पावसाचे पाणी गटारीतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर पडले. 

गटार तुंबल्याने गटारातील कचरा असा रस्त्यावर पसरत आहे. 

      तुंबलेल्या गटार पाहून अडकूर येथील युवकांनी सामजिक बांधिलकी जपत अडकुर मेन रोडवरील गटाराची भरपावसात स्वच्छता केली.  त्यामधील पाणी हे नाल्यामध्ये वळवण्यात आले. शिवराज देसाई, आनंद भोसले, सुरेंद्र आर्दाळकार, संतोष देसाई, लक्ष्मण चौगुले यांनी याकामी परिश्रम घेतले. 




No comments:

Post a Comment