![]() |
संततधार पावसामुळे नद्याच्या पाणीपातळीत वाढ. |
संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
गेले दोन दिवस चंदगड तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. संततधार पावसामुळे नद्याच्या पाणीपातळीतवाढ झाल्याने पिळणी, बिजूर, भोगोली, कानडी, गणुचीवाडी, कानडेवाडी, तारेवाडी, गवसे, हल्लारवाडी, कोनेवाडी, हिंडगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटे नरेवाडी ल. पा तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून विसर्ग सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावर वळवली आहे. सकाळपासून चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस नेसरी व आजरामार्गे वळविण्यात आल्या आहेत.
![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे पहाटे श्रीमती सुनंदा जोतिबा पाटील राहते घर पूर्णतः कोसळले. |
संततधार पावसामुळे कालकुंद्री येथे पहाटे साडेसहा वाजता श्रीमती सुनंदा जोतिबा पाटील (वय 60) यांचे राहते घर पूर्णतः कोसळले आहे. यामध्ये अंदाजे नुकसान १ लाख २० हजार रुपयांचे तर दाटे येथील दीपक गोपाळ वाळके यांची राहत्या घराची भिंत पडून अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
![]() |
दीपक गोपाळ वाळके (रा. दाटे) यांची राहत्या घराची भिंत पडून अंदाजे 5000 चे नुकसान झाले. |
![]() |
चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलाला लागून पाणी जात आहे. पावसाची संततधार सुरुच राहिल्यास सकाळपर्यंत हा पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. |
चंदगड तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठी प्रकल्पाचे नाव व कंसात टक्केवारी -
तालुक्यातील सर्व प्रकल्पाची एकूण टक्केवारी सरासरीमध्ये – 59.26
मध्यम प्रकल्प - घटप्रभा (103.74), जांबरे (82.00) व जंगमहट्टी (28.55)
लघु पाटबंधारे प्रकल्प - आंबेवाडी (42.12), दिंडलकोप (31.63), हेरे (15.85), जेलुगडे (23.60), कळसगादे (11.86), करंजगाव (33.77), खडकओहोळ (20.21), किटवाड क्र.1 (34.77), किटवाड क्र.2 - (41.43), कुमरी (40.15), लकिकट्टे (59.79), निट्टूर क्र.2 (27.25), पाटणे (31.17), सुंडी (33.71), काजिर्णे (67.51).
प्रकल्पातील आजचा पाणीसाठा..........
जंगमहट्टी (मध्यम प्रकल्प)
पाणी पातळी – 717.40 मी
एकूण पाणीसाठा – 9.946द.ल.घ.मी (351.19 द.ल.घ.फू.)
टक्केवारी - 28.55%
मागील 24 तासातील पाऊस 180 मि.मी.
1 जून 2021 पासून एकूण पाऊस –418मि.मी.
सांडवा विसर्ग - 0 क्युसेक्स
विद्युतगृह विसर्ग-00 क्युसेक्स
सिंचन विमोचक विसर्ग- 100 क्युसेक्स
घटप्रभा (मध्यम प्रकल्प)
पाणी पातळी – 743.00मी
एकूण पाणीसाठा – 45.793 द.ल.घ.मी (1617.20 द.ल.घ.फू.)
टक्केवारी - 103.74%
मागील 24 तासातील पाऊस 155 मि.मी.
1 जून 2021 पासून एकूण पाऊस – 600 मि.मी.
सांडवा विसर्ग - 3093 क्युसेक्स
विद्युतगृह विसर्ग-900 क्युसेक्स
सिंचन विमोचक विसर्ग- 0 क्युसेक्स
जांबरे (मध्यम प्रकल्प)
पाणी पातळी – 734.10मी.
एकूण पाणीसाठा – 19.079 द.ल.घ.मी / 673.68द.ल.घ.फू"
टक्केवारी - 82%
मागील 24 तासातील पाऊस - 231 मि.मी.
1 जून 2021 पासून एकूण पाऊस – 610मि.मी.
सांडवा विसर्ग – 0.0क्युसेक्स .
विद्युतगृह विसर्ग - 0.0 क्युसेक्स.
सिंचन विमोचक विसर्ग- 10क्युसेक्स
चित्री (मध्यम प्रकल्प, ता. आजरा)
आजची पाणी पातळी – 706.800 मी.
एकूण पाणीसाठा – 23.993 द.ल.घ.मी (847.31 द.ल.घ.फू.)
टक्केवारी - 44.92 %
मागील 24 तासातील पाऊस= 166 मि.मी.
1 जून 2021 पासून एकूण पाऊस = 428 मि.मी.
सांडवा विसर्ग - 0 क्युसेक्स
विद्युतगृह विसर्ग- 0 क्युसेक्स
सिंचन विमोचक विसर्ग- 0 क्युसेक्स
No comments:
Post a Comment